मुुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय बॉम्ब फुटला. त्यानंतर सरकार कोसळणार म्हणून लगेचच मंत्रालयातील मंत्र्यांची धावपळ सुरू झाली. त्यानंतर लगेच 21 जुन आणि 22 जुन रोजी पाणी पुरवठा आणि जलसंधारणा विभागाचे सर्वाधिक 106 जीआर निघाले आहेत. त्यामुळे राज्याच्या एका बाजूला महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या गटाने खळबळ उडवून दिली असताना आता पाणी पुरवठा आणि जलसंधारण विभागाचे सर्वाधिक जीआर निघाले आहेत. त्यामुळे एकच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
शिंदे गटाचा आता थेट धनुष्यबाणावरच दावा; शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार असल्याचं चित्र असताना मंत्रिमंडळाची बैठक काल पार पाडली. यावेळी 2021 पासून सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर इतरही काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच आता महाविकास आघाडीच्या अस्थिरमुळे मंत्र्यांची धावपळ सुरू आहे.
शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री अन् केंद्रात 2 मंत्रीपद
मागील 21 जुन ते 22 जुन रोजी मंत्रिमंडळात आमदारांना 1 हजार 770 कोटी पैकी 319 कोटींची निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाणी पुरवठा आणि जलसंधारण विभागाचे सर्वाधिक 106 जीआर काढण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे. तसेच पाणी पुरवठा विभाग हा गुलाबराव पाटील यांच्याकडे तर जलसंधारण विभाग हा शंकराराव गडाख यांच्याकडे सध्या आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या बंडांचा रविवारी शपथविधी होणार ?
दरम्यान, काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असणार की नाही याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याआधीच सर्वाधिक जीआर काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा बंड कधी थंड होतो, आणि राज्याच्या राजकारणात आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात. ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- डबलढोलकी कैलास पाटलांनापासून पक्षप्रमुखांनी सावध रहावं; तानाजी सावंतांनी केली पोलखोल
- “उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे”; राष्ट्रवादीचा ठाकरेंना भक्कम पाठिंबा
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली
- “तुम्ही या, आघाडीतून बाहेर पडू”; राऊतांच्या वक्तव्यावर काॅंग्रेस नाराज; काॅंग्रेसने लगचेच बैठक बोलवली
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;