मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडात 4 मंत्री आणि जवळपास 47 आमदार सामील झाले आहेत. काल कृषीमंत्री दादा भुसे देखील शिंदे गटात गुवाहाटी याठिकाणी पोहचले आहेत. गटनेतापदावरून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेंचं बंड अन् दोन दिवसातच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरीत
संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या. असं म्हणत त्यांनी दादा भुसे यांना टोला लगावला आहे.
डबलढोलकी कैलास पाटलांनापासून पक्षप्रमुखांनी सावध रहावं; तानाजी सावंतांनी केली पोलखोल
शिवसेनेचे तसेच अपक्ष 7 ते 8 आमदार हे आधी सुरत आणि मग पुढे गुवाहाटी येथे चार्टर्ड विमानाने जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिंदे गटात जवळपास 50 आमदार सामील झाल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सही केलेलं पत्र आज एकनाथ शिंदे गट राज्यपालांना तसेच विधान सभा उपाध्यक्षांकडे देणार आहेत.
“उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे”; राष्ट्रवादीचा ठाकरेंना भक्कम पाठिंबा
दरम्यान, शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. रफिक शेख असं त्या कार्यकर्त्यांच नाव असून शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीबाबत देखील यामध्ये भाष्य केलं आहे.
Read also:
- सगळं ठरलंय, फडणवीस मुख्यमंत्री, अन् शिंदे साहेब उपमुख्यमंत्री; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
- “गुवाहाटीत रूसलेले शिवसेनेचे आमदार उद्या मुंबईत दाखल होतील” जयंत पाटील
- “बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असेल असं मला वाटत नाही”; अजित पवार
- सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
- शिंदेंची समजुत काढायला गेलेले रविंद्र फाटकच दोन आमदारांना घेऊन गुवाहाटीत दाखल