पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आरोपीला पंधरा तासात जामीन अन् नंतर मिळालेली शिक्षा पाहून सगळेच जण संताप व्यक्त करू लागले. त्यानंतर आरोपीचा एक चीड आणणारं रॅप सॉंग बाहेर आल्याने संपुर्ण शहरात संतापाची लाट उसळली. मात्र हा रॅप सॉंग आरोपीने बनवला नसून दुसऱ्याने बनवला अन् सोशल मीडियावर टाकला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा..“गजानन किर्तीकर यांच्या रक्तात ओरिजनल शिवसैनिक जागा झालाय”
पोर्श कार अपघातानंतर अतिशय चीड आणणारे रॅप सॉंग व्हायरल झाले होते. हे गाणं गाणारा मुलगा दिल्लीमधील व्हिडीओ क्रिएटर असून ते ग्रॅव्हिटी मीडियामध्ये मिम्स मेकर म्हणून काम करतो. आर्यन देव असं त्याचं नाव असून तो मुळचा मध्यप्रदेशमधला असल्याची माहिती समोर आलीय. अपघात झाल्यानंतर त्याने प्रसिद्धीसाठी असलं कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुणे सायबर विभागाने यासंदर्भात शोध घेतला असता. त्याचे नाव उघड झाले आहे.
हेही वाचा..विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर, दोन शिलेदार देणार कडवी टक्कर
दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी आर्यन देव नीखरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ५०९, २९४ ब या कलमांनुसार आता आर्यनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“चंद्र सुर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री हवेत,” तटकरेंचा चव्हाणांना टोला
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा..“जरांगे पाटलांच्या विरोधामुळे उमेदवारी टळली, नाहीतर…”भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा..“इंग्लिश कशाला हवी, आम्हाला बाया नाचवायच्या नाहीत”