मुंबई : विधान परिषदेवरील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या प्रत्येकी दोन जागांसाठी केंद्रीय निवडणुक आयोगाने सुधारित वेळापत्रक जारी करत निवडणुकीची घोषणा केली आहे. यासाठी आता येत्या २६ जूनला मतदान होणार असून येत्या ०१ जुलै मतमोजणी होणार आहे. यातच घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर शिंदेंकडून संभाव्य उमेदवारांची नावं समोर आली आहेत.
हेही वाचा…“आधी ड्रायव्हरला आमीष दाखवलं, नंतर धमकावलं,” आरोपीच्या आजोबालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई पदधीवधर मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. दिपक सावंत यांचं नाव चर्चेत आलं आहे. याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री अनिल परब यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे दिपक सावंत विरूद्ध अनिल परब असा सामाना याठिकाणी रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिपक सावंत यांनी शिवसेनेकडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांना त्याठिकाणी संधी देण्यात आलेली नाही. यातच २००६ ते २०१२ असे सलग दोन वेळा ते शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. मात्र २०१८ साली त्यांना तिसऱ्यांदा संधी नाकारली. यातच २०१४ साली फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
हेही वाचा..“सध्या उत्तराधिकारीबाबत भाजप पक्षांतर्गत भांडण सुरू”, आता उरले फक्त योगीजी”
मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना संधी देण्यात आली आहे. यातच आता दुसऱ्या बाजूला महायुतीकडून याठिकाणी कुणाला संधी दिली जाईल. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत ०७ जुलै रोजी संपत आहे. निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपणार आहे.
दरम्यान, मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची घोषणा करण्यात आली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल येत्या ०१ जूलै रोजी लागणार आहे. यासाठी ३१ मे ते ०७ जुन पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज भरता येणार आहे. तर १० जून रोजी अर्जाची छानणी तर १२ जुनपर्यंत आपला उमेदवारी अर्ज माघे घेता येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ निंबध स्पर्धा”, विषय वाचून हैराण व्हाल
हेही वाचा..“जरांगे पाटलांच्या विरोधामुळे उमेदवारी टळली, नाहीतर…”भुजबळांचं मोठं विधान
हेही वाचा..“इंग्लिश कशाला हवी, आम्हाला बाया नाचवायच्या नाहीत”
हेही वाचा..“गजानन किर्तीकर यांच्या रक्तात ओरिजनल शिवसैनिक जागा झालाय”
हेही वाचा..विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून दोन उमेदवार जाहीर, दोन शिलेदार देणार कडवी टक्कर