मुंबई : शिवसेनेच्या विधान परिषद गटनेता पदी एकनाथ शिंदे आणि मुख्य प्रतोपदपद हे भरत गोगावलेच असल्याचे पत्र आज विधानसभा उपाध्यक्षाकडे शिंदे गट पाठणार आहे. या पत्रावर शिवसेनेचे जवळपास 37 आमदारांनी सही केले आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आता यावर काय निर्णय घेतात? त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आता शिंदे गटातील एका आमदारांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डबलढोलकी कैलास पाटलांनापासून पक्षप्रमुखांनी सावध रहावं; तानाजी सावंतांनी केली पोलखोल
शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. रफिक शेख असं त्या कार्यकर्त्यांच नाव असून शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीबाबत देखील यामध्ये भाष्य केलं आहे.
“उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे”; राष्ट्रवादीचा ठाकरेंना भक्कम पाठिंबा
एका कार्यकर्त्यांनी त्यांना फोनवरून तुम्ही सध्या कुठे आहेत? विचारल्यावर ते म्हणाले की, काय झाडी, काय डोंगर सगळं ओके. मी गुवाहाटीत आहे. इकडं काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सगळं ओके आहे. कोणाला फोन करू नका असा नेत्याचा आदेश होता. त्यामुळे फोन केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत. पण त्यांचे रिझल्ट करेक्ट आहेत. मला हे नेतृत्व खुप आवडलं आहे. आपली ओळख नाही तरीपण त्यांनी माझी विचारपुस केल्याचं शहाजी पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीबाबत बोलताना ते म्हणाले की, आपल्या लोकांचं शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील साहेबांसोबत पटत नाही. तसेच एकही आमदार उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात नाही. त्यांना देव माणूस मानत आहे. पुढच्या अडीच वर्षात तालुक्याचा ऐतिहासिक विकास होणार आहे. तुम्ही बघत रहा. पण हे सांगत असताना गेल्या अडीच वर्षातमध्ये सांगोला उपसा सिंचन योजनेला नाव आपण हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या अशी मागणीची बारा पत्र दिली असतानाही ते झालं नाही. तसेच त्यांनी सांगोल्याचे दिंवगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आपणास सभागृहात बोलू दिले नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यानंतर ही ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Read also:
- “गुवाहाटीत रूसलेले शिवसेनेचे आमदार उद्या मुंबईत दाखल होतील” जयंत पाटील
- “बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असेल असं मला वाटत नाही”; अजित पवार
- सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
- शिंदेंची समजुत काढायला गेलेले रविंद्र फाटकच दोन आमदारांना घेऊन गुवाहाटीत दाखल
- एकनाथ शिंदेंचं बंड अन् दोन दिवसातच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरीत