मुंबई : बापाला धमकी देण्याचं काम नारायण राणे यांच्यासारख्या बेडकांनी करू नये, अशी खरमरीत टिका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी केली आहे. काल शरद पवारांनी बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात आल्यावर भाजपचे कोणते नेते मदत कऱणार ते पाहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर नारायण राणे यांनी शरद पवारांना घरी जाण्यासाठी रस्ता मिळणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावर आता रूपाली पाटील यांनी राणेंवर टिका केली आहे.
“बंडखोरीमागे भाजपचाच हात, त्यांची आग्राहुन सुटका करावीच लागेल”; ठाकरेंचा आता भाजपवर हल्लाबोल
शिवसेनेचे आमदार ते आमचे आमदार आहेत. त्यासाठी तुम्ही पाठिंबा देत आहात. यावरून ही खेळी भाजपच्या इडी आणि सीबीआयच्या यंत्रणेची असल्याचं स्पष्ट होते. मोदींना जाऊन विचार की शरद पवार साहेब यांचे बोट धरून राजकरणात आले असे ते स्वत: म्हणाले होते बरं. असंही त्या म्हणाल्या. परिस्थिती कितीही खंबीर असली तरी त्यावर लढण्याची ताकद आहे.
ठाकरे अन् शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा; बंडखोर आमदारांना ठाकरेंचं आवाहन
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल. असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे आता भाजप याला कसे प्रत्यत्तर देणार ते आता पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.?
बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यानंतर भाजपची मोठी खेळी; थेट राज्यपालांना पत्र
दरम्यान, शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. तसेज अजूनपर्यंत त्यांचा भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सादर आला नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
Read also:
- बंडखोर एकनाथांकडे ‘इतकी’ आहे संपत्ती: 7 महागड्या गाड्या, 9 कोटींची घरं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तुल
- “कॅन्सरग्रस्त असताना कोणत्याही नेत्यांनी विचारपुस केली नाही”; बंडखोर आमदाराचा आरोप
- भास्करराव जाधव शिवसेनेच्या विरोधात बंड करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले..;
- “अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, मी याआधीच म्हटलं होतं”; चंद्रकांत पाटील
- निलंबित करण्याचं पत्र देताच शिंदे गटातील आमदारांनी गाठलं थेट विधानभवन