मुंबई : बऱ्याच काही दिवसापांसून शिवसेनेचे 38 आमदार गुवाहाटी येथे थांबले आहेत. बंडखोर आमदार आणि शिवसेनेमध्ये धनुष्यबाणावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर आता शिंदे गटाचं नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं नाव शिंदे यांच्या गटाने एकमताने मंजूर झालं आहे. त्यामुळे आता या गटाचं नोंदणी देखील करण्यात येणार आहे. आज 2 वाजता एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषेद घेऊन या नावाची अधिकृत नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
बंडखोर एकनाथांकडे ‘इतकी’ आहे संपत्ती: 7 महागड्या गाड्या, 9 कोटींची घरं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तुल
त्याआधी आज दुपारी चार वाजता ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक जमणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. ठाण्याचे सर्वार्थाने पालक असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांना आपले सर्मथक देऊया, शिंदे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी उद्या 25 जुनला दुपारी 4 वाजता साहेबांच्या निवासस्थानी जमुया, असे संदेश शिंदे समर्थकांकडून पाठवले जात आहेत.
“कॅन्सरग्रस्त असताना कोणत्याही नेत्यांनी विचारपुस केली नाही”; बंडखोर आमदाराचा आरोप
बंडखोर आमदारांच्या कुटुंबियाची सुरक्षितता राज्य सरकारकडून काढून घेण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे. असंही ते म्हणाले.
भास्करराव जाधव शिवसेनेच्या विरोधात बंड करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले..;
दोन ते तीन दिवस झाले असून देखील बंडखोर आमदारांचं बंड काही थांबता थांबेना झालं आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहारांत शिवसेना आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफो़ड आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आज पुण्यात बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
Read also:
- ठरलं…! एकनाथ शिंदेंच्या गटात नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ ठेवण्यात आलं
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
- गायब सचिन जोशी कोण, त्यांचा बंडांशी काय संबंध? व्हायरल झालेल्या फोटोमुळे खळबळ
- “बापाला धमकी देण्याचं काम राणेंसारख्या बेडकांनी करू नये”; रूपाली पाटलांचा राणेंना इशारा