मुंबई : राज्यात शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे यांनी तब्बल 47 आमदारांसह गुवाहाटी गाठलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीला सुरत येथे नेण्यात आले, आणि त्यानंतर आता गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लु या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल 56 लाखांचा खर्च होत असल्याची माहिती समोर येत आहे.
“बापाला धमकी देण्याचं काम राणेंसारख्या बेडकांनी करू नये”; रूपाली पाटलांचा राणेंना इशारा
आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांना ठेवण्यात आले आहेत. या हॉटेलमधील 196 रूम असून त्यातील 70 रूम हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आले आहेत. बंडखोरांच्या या लवाजम्यासाठी दिवसाला 8 लाखांचा खर्च होत असून सात दिवसांचा खर्च हा 56 लाख रूपये इतका असल्याचं एनडीटिव्हीने दिलेल्या बातमीनुसार आहे.
बंडखोर एकनाथांकडे ‘इतकी’ आहे संपत्ती: 7 महागड्या गाड्या, 9 कोटींची घरं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तुल
आसाम मधील रॅडिसन ब्लु येथील हॉटेल सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या हॉटेलमध्ये कोणालाही हॉटेलमध्ये परवानगी देण्यात आलेली नाही. या आधा ज्या काॅन्फरन्स आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यांचे बुकिंग आधीच करून ठेवण्यात आलं होतं. ते सर्व बुकिंग रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
“कॅन्सरग्रस्त असताना कोणत्याही नेत्यांनी विचारपुस केली नाही”; बंडखोर आमदाराचा आरोप
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड करून सुरूवातीला सुरत गाठलं होतं. त्यानंतर 3 चार्टर्ड विमान आणि 17 महागाड्या गाड्यांनी त्यांना गुवाहाटीत नेण्यात आले. मात्र इतका खर्च नेमका कोण करत आहे. असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तसेच एकीकडे आसाममध्ये पुरानं थैमान घातलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र आसाम मधील सर्व पोलीस प्रशासन बंडखोर आमदारांच्या सुरक्षितेसाठी देण्यात आले असल्याचा आरोप आसाम काॅंग्रेसने केला आहे.
Read also:
- ठरलं…! एकनाथ शिंदेंच्या गटात नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ ठेवण्यात आलं
- ठरलं…! एकनाथ शिंदेंच्या गटात नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ ठेवण्यात आलं
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
- गायब सचिन जोशी कोण, त्यांचा बंडांशी काय संबंध? व्हायरल झालेल्या फोटोमुळे खळबळ