मुंबई : बंडखोर एकनाथ शिंदें यांच्या गटाने आज त्यांच्या गटाचं नाव शिवसेना बाळासाहेब असणार आहे, असं बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. त्यानंतर लगेचच शिवसेनेची कार्यकारणी बैठक पार पडली त्यात चार ठराव मंजूर करण्यात आले असून उद्धव ठाकरे यांनांच शिवसेनेचे अधिकार असल्याचा ठराव यामध्ये मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेसोबत बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा ठराव देखील त्यांनी या बैठकीत मांडला आहे.
“बापाला धमकी देण्याचं काम राणेंसारख्या बेडकांनी करू नये”; रूपाली पाटलांचा राणेंना इशारा
एकनाथ शिंदे गटांने थेट शिवसेनेवर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. काल जिल्ह्याप्रमुखांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच मराठी अस्मितेशी कधीही प्रतारणा कऱण्यात येणार नाही. तसेच शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि राहिल, असा ठराव आज शिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीत ठराव मांडण्यात आला.
बंडखोर एकनाथांकडे ‘इतकी’ आहे संपत्ती: 7 महागड्या गाड्या, 9 कोटींची घरं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तुल
शिवसेनेतील तब्बल 37 आमदार एकनाथ शिंदे गटात सध्या सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडील गटनेता पद देखील काढून घेण्यात आलं. तसेच शिवसेना भवानात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचं मंत्रीपद, तसेच गटनेता पद आणि इतर मंत्र्यांचं पद देखील काढून घेण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या मुलांकडील शिवसेनेतील युवा अध्यक्षांचा देखील कारभार काढून घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“कॅन्सरग्रस्त असताना कोणत्याही नेत्यांनी विचारपुस केली नाही”; बंडखोर आमदाराचा आरोप
दरम्यान, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या कडून देखील शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता मोठा पेच निर्माण झाला आहे. तसेच शिवसेनेतील तब्बल 37 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे.
Read also:
- बंडखोर आमदारांवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला जातोय ‘इतका’ खर्च; सात दिवसांसाठी 70 रूम बुक
- ठरलं…! एकनाथ शिंदेंच्या गटात नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ ठेवण्यात आलं
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
- गायब सचिन जोशी कोण, त्यांचा बंडांशी काय संबंध? व्हायरल झालेल्या फोटोमुळे खळबळ