मुंबई : एकनाथ शिंदे यांनी जे केलं ते कसं बरोबर आहे ते दाखवण्यासाठी लोकांनी त्यांना समर्थन दिलं. शिवसेनेचा भगवा अजूनही डौलाने फडकतो आहे. शिंदे साहेब आजही सांगताहेत की आजही ते शिवसेनेतच आहे. शिंदे साहेबांसोबत चाळीस शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष आमदार आहेत. अडीच वर्ष अनैसर्गिक आघाडी झाली, त्यातून बाहेर पडलं पाहिजे कार्यकर्त्यांची आज एकच तक्रार आहे. सत्ता आल्यावर त्यांचा विकास होईल. असे त्यांना वाटत होते. मात्र त्यांची कामं झाली नाहीत. असं एकनाथ शिंदे यांचा सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थानात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी; नवनीत राणांची अमित शहांकडे मागणी
राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी निधी थांबवण्याचं काम केलं. आज सत्तेत असूनही आमच्यावर अन्याय होत असेल तर काय फायदा अशा सत्तेचा? हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. हिंदुत्वाचा विचार त्यांनी घातला आहे. प्रत्येक ठिकाणी हे आघाडीतील पक्ष हे शिवसैनिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्याशी आघाडी तोडा आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. शेवटपर्यंत राहणार आहे. पोस्टरवर काळं फासण्याचा प्रकार झाला मात्र त्यांना मला सांगायचं आहे आमच्या नादी लागू नका असंही ते म्हणाले.
शिवसेना कार्यकारणीत 4 ठराव मंजूर; बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरेंचा आता एल्गार
सर्व कारखान्यांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. साधा उस कारखान्याला घालयचा असेल तर त्याला आधी पक्ष विचारला जातो. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उस जाळावा लागतो. कुणाला पद दिलं तर सांगतात कारखान्यात लाग पद सोडून दे. या आधीच वर्षात इतका असंतोष कधी झाला नव्हता. असंही ते म्हणाले.
बंडखोर आमदारांवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला जातोय ‘इतका’ खर्च; सात दिवसांसाठी 70 रूम बुक
दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकारणी सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असून मी त्यांचा पुत्र आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जळगावात काही कार्यकत्यांनी महादेवाच्या पिंडीवर थपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्युत्य शिखरावर पोहचलेल्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहु, अशी अशा प्रकराची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे. तर नवी मुंबईत बंडखोर आमदारांचे प्रतिमात्मक पुतळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जाळण्यात आले. तर उल्लासनगर येथील बंडखोर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली आहे.
Read also:
- लक्षात ठेवा..! शिंदे साहेबांमुळे शांत बसलो आहे; ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
- “राष्ट्रवादी- काॅंग्रेसकडून शिवसेना हायजॅक, आम्ही अजूनही शिवसेनेतच”; बंडखोर आमदार दिपक केसरकर
- “गद्दारांना शिवसेनेत पुन्हा जागा नाही, शिवसेना निखार, पाय ठेवाल तर जळाल”
- हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- सेनेच्या ‘या’ 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस; विधानसभा उपाध्यक्षांनी सोमवारपर्यंत दिला वेळ