मुंबई : निंबलित करण्याची नोटीस पाठवून आम्हाला घाबवण्यात येत आहे. आम्ही शिवसेनेत आहेत. एकनाथ शिंदे आमचे गटनेते राहतील. शिवसेनेला कोणीही हॉयजॅक केली नाही. शिवसेना ही राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसने हॉयजॅक केली आहे. आम्ही आमच्या मतांवर ठाम आहोत. नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्याला उत्तर दिलं जाईल, असं म्हणत शिंदे गटातील आमदार दिपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.
बंडखोर आमदारांवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला जातोय ‘इतका’ खर्च; सात दिवसांसाठी 70 रूम बुक
शिवसैनिकांनी मोडतो़ड करू नये. कायद्याचे पालन करावे. महाराष्ट्रात घटनेचे उल्लघन होत असेल तर न्यायालयात जाऊ. शिवसैनिकांनी रस्त्यावर येण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही पक्षात विलिन होणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत. आम्ही त्यांच्या विचारासोबत आहेत. शिंदे गटाने शिवसेना हायजॅक केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की काॅंग्रेस-राष्ट्रवादीनेच शिवसेना हायजॅक केली होती. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीसा बजावल्या आहेत. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ठरलं…! एकनाथ शिंदेंच्या गटात नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ ठेवण्यात आलं
आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही पक्ष सोडलेला नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याचा दावा देखील दिपक केसरकर यांनी केला आहे. यामध्ये आमची सर्व भूमिका आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. अजूनही वेळ गेली नाही. त्यांनी त्यावर विचार करावा. तसेच महाराष्ट्रात जे काही घडत आहे. त्यामुळे सुरक्षितेचा विचार करून आम्ही महाराष्ट्रात परत येऊ , असंही ते म्हणाले.
” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकारणी सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असून मी त्यांचा पुत्र आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जळगावात काही कार्यकत्यांनी महादेवाच्या पिंडीवर थपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्युत्य शिखरावर पोहचलेल्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहु, अशी अशा प्रकराची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे. तर नवी मुंबईत बंडखोर आमदारांचे प्रतिमात्मक पुतळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जाळण्यात आले. तर उल्लासनगर येथील बंडखोर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली आहे.
Read also:
- “गद्दारांना शिवसेनेत पुन्हा जागा नाही, शिवसेना निखार, पाय ठेवाल तर जळाल”
- हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- सेनेच्या ‘या’ 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस; विधानसभा उपाध्यक्षांनी सोमवारपर्यंत दिला वेळ
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी; नवनीत राणांची अमित शहांकडे मागणी
- शिवसेना कार्यकारणीत 4 ठराव मंजूर; बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरेंचा आता एल्गार