मुंबई : शिवसेनेतील 16 बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस पाठवली आहे. त्यांना सोमवारी सांयकाळी 4 पर्यंत यावर उत्तर देण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यावर निलंबण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील मोठ्या नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अशातच आता शिवसेनेची कार्यकाराणी बैठक देखील होत आहे. यामध्ये 4 ठराव मंजूर करण्यात आली आहे.
” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
बंडखोर आमदारांपैकी एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किर्णीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय सयमुलकर, चिमणराव पाटील, रमेश बोरवणे, यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवार पर्यंत यांनी जर उत्तर दिला नाही तर त्यांच्यावर शिवसेनेतून निलंबण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
गायब सचिन जोशी कोण, त्यांचा बंडांशी काय संबंध? व्हायरल झालेल्या फोटोमुळे खळबळ
काल उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अपक्ष आमदारांवर निलंबण्याचा अधिकार नाही. असा प्रस्ताव अपक्ष आमदार महेश बालादाणी आणि विनोद अग्रवाल यांनी दिला होता. मात्र हा प्रस्ताव आता फेटाळण्यात आला आहे. हा प्रस्ताव इमेलद्वारे देण्यात आला होता. त्यामुळेच हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता हे बंडखोर आमदार आता उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
“बापाला धमकी देण्याचं काम राणेंसारख्या बेडकांनी करू नये”; रूपाली पाटलांचा राणेंना इशारा
दरम्यान, शिवसेनेतील तब्बल 37 आमदार एकनाथ शिंदे गटात सध्या सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडील गटनेता पद देखील काढून घेण्यात आलं. तसेच शिवसेना भवानात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचं मंत्रीपद, तसेच गटनेता पद आणि इतर मंत्र्यांचं पद देखील काढून घेण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच बंडखोर आमदारांच्या मुलांकडील शिवसेनेतील युवा अध्यक्षांचा देखील कारभार काढून घेण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Read also:
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी; नवनीत राणांची अमित शहांकडे मागणी
- शिवसेना कार्यकारणीत 4 ठराव मंजूर; बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरेंचा आता एल्गार
- बंडखोर आमदारांवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला जातोय ‘इतका’ खर्च; सात दिवसांसाठी 70 रूम बुक
- ठरलं…! एकनाथ शिंदेंच्या गटात नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ ठेवण्यात आलं
- ” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”