मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारणी सभेत आज ठराव मांडण्यात आला होता. यामध्ये शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि उद्याही राहणार आहे. तसेच मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी कधीही प्रतारणा केली जाणार नाही. तसेच शिवसेनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे राहतील असे ठराव मांडण्यात आले होते. या बैठकीत सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.
ठरलं…! एकनाथ शिंदेंच्या गटात नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ ठेवण्यात आलं
शिवसेनेच्या या कार्यकारणी सभेत रामदास कदम, अनंत अडसुळ आणि भास्करराव जाधव अनुपस्थित होते. मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत बंडखोर आमदार आणि शिवसेना फोटण्यामागे भाजपचाच डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या सभेत अनेक शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
या कार्यकारणी सभेत 6 ठराव मंजूर कऱण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि राहणार. त्यांच्या विचारांशी कधीही प्रतारणा होणार नाही. मराठी अस्मितेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा विश्वास आहे. ज्यांनी शिवसेनेशी बेईनामी केली आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा नाव कोणत्याही राजकारणासाठी वापण्यात येणार नाही. असाही ठराव मांडण्यात आला. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
” राऊतांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक, बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड”
दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकारणी सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची असून मी त्यांचा पुत्र आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जळगावात काही कार्यकत्यांनी महादेवाच्या पिंडीवर थपथ घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्युत्य शिखरावर पोहचलेल्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहु, अशी अशा प्रकराची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे. तर नवी मुंबईत बंडखोर आमदारांचे प्रतिमात्मक पुतळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जाळण्यात आले. तर उल्लासनगर येथील बंडखोर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली आहे.
Read also:
- हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- सेनेच्या ‘या’ 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस; विधानसभा उपाध्यक्षांनी सोमवारपर्यंत दिला वेळ
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी; नवनीत राणांची अमित शहांकडे मागणी
- शिवसेना कार्यकारणीत 4 ठराव मंजूर; बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरेंचा आता एल्गार
- बंडखोर आमदारांवर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला जातोय ‘इतका’ खर्च; सात दिवसांसाठी 70 रूम बुक