मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टिका करताना किरीट सोमय्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का? असा सवाल एकनाथ शिंदे गटाला केला होता. त्यावर आता बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल आता बंडखोर आमदार शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी केला आहे.
देवा लवकर आटप रे हे सगळं..! हॅाटेलचे बिल वाढतेय; दिपाली सय्यदचा खोचक टोला
सुभाष साबणे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?असासवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे साहेबांना विचारला आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदारांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. बाळासाहेबाना अटक केल्यानंतर याबाबत विधानसभेत जाब विचारणाऱ्या साबणे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं.
“अजित दादांनी शिवसेनेचा निधी थांबवण्याचं काम केलं”;श्रीकांत शिंदेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू. अस एकनाश शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे.
लक्षात ठेवा..! शिंदे साहेबांमुळे शांत बसलो आहे; ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
दरम्यान, शिंदे गटातील १५ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेच दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. एक तर आमदारांनी उपाध्यक्षांना बेकायदेशीय ठरवून आमदारांना अपात्र नोटिशीला आव्हान दिले आहे. दुसरे म्हणजे त्यांनी स्वत: ला आणि आपल्या कुटुंबाला न्यायालयाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकिल हरीश साळवे आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. त्यावेळी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवदत्त कामत लढणार आहे. तर उपाध्यक्षांसाठी अधिवक्ता रविशंकर जंध्याला लढणार आहे. आमदारांच्या वतीने दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहे.
Read also:
- शिंदे गटाच्या वकिलाची फी एका दिवसाची तब्बल ३० लाख; ठाकरे अन् शिंदे गटाची न्यायालयात सुनावणी
- “राणा बाई थोडी कळ काढा, हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील”
- काय ती झाडी, काय तो डोंगर, म्हणणाऱ्या बंडखोर आमदाराला राऊतांनी फटकारलं
- बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटीवरून आता गोव्यात स्वारी; भाजपच्या 3 नेत्यांकडे जबाबदारी ?
- पत्रकारांना चकवा देत ‘एकनाथ शिंदे’ काल गुजरातमध्ये; फडणवीससोबत चर्चा झाल्याची माहिती