मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे निर्माण राजकीय परिस्थिती पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली. त्यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा असं देखील म्हटलं आहे. त्यावर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी नवनीत राणा यांची शाळा घेतली आहे.
लक्षात ठेवा..! शिंदे साहेबांमुळे शांत बसलो आहे; ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
दिपाली सय्यद म्हणाल्या की, राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतुन सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे… असं म्हणत त्यांनी नवनीत राणा यांना जोरदार टोला लगावला आहे.
“राष्ट्रवादी- काॅंग्रेसकडून शिवसेना हायजॅक, आम्ही अजूनही शिवसेनेतच”; बंडखोर आमदार दिपक केसरकर
गेल्या काही दिवसापासून शिवसेना आणि राणा दाम्तपत्यांचा हनुमाना चालिसावरून खडाजंगी होताना पहायला मिळत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा शिवसेनेवर सातत्याने टिका करताना दिसत आहे. अशातच राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यात हस्तक्षेप करून राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी केली आहे.
“गद्दारांना शिवसेनेत पुन्हा जागा नाही, शिवसेना निखार, पाय ठेवाल तर जळाल”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आज सहावा दिवस असून अजूनही ते गुवाहाटीत आहेत. मात्र आता भाजपकडून देखील हालचाली सुरू केल्या असून सोमवारी भाजपचे आमदार आणि बंडखोर आमदार गोव्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण झाल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंह यांच्याकडून गोव्याच्या राज्यपालांकडे राज्याचा प्रभारी कारभार सोपवला आहे. त्यामुळे भाजप आणि बंडखोर आमदार गोव्यातच सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.
राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतुन सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे… @AmitShah @BJP4Maharashtra @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 26, 2022
Read also:
- काय ती झाडी, काय तो डोंगर, म्हणणाऱ्या बंडखोर आमदाराला राऊतांनी फटकारलं
- बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटीवरून आता गोव्यात स्वारी; भाजपच्या 3 नेत्यांकडे जबाबदारी ?
- पत्रकारांना चकवा देत ‘एकनाथ शिंदे’ काल गुजरातमध्ये; फडणवीससोबत चर्चा झाल्याची माहिती
- देवा लवकर आटप रे हे सगळं..! हॅाटेलचे बिल वाढतेय; दिपाली सय्यदचा खोचक टोला
- “अजित दादांनी शिवसेनेचा निधी थांबवण्याचं काम केलं”;श्रीकांत शिंदेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप