मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारण मोठा भुंकप आला आहे. या भुकंपचा केंद्रबिंदु आता सुरतवरून गुवाहाटीला असल्याचं समजत आहे. ते आता गोव्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कारण आता भाजपचे काही आमदार गोव्यात दाखल होत असून बंडखोर आमदारांना देखील गोव्यात आणलं जाणार आहे. तेथेच बंडखोर आमदार आणि भाजपचे आमदार सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“गद्दारांना शिवसेनेत पुन्हा जागा नाही, शिवसेना निखार, पाय ठेवाल तर जळाल”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर महाराष्ट्राचा कारभार गोव्याच्या राज्यपालांकडे सोपवण्यात आला. त्यामुळे गोव्यात जाऊन बंडखोर आणि भाजपचे आमदार तिथे दावा करू शकणार आहे. भाजपकडून नितेश राणे, महेश लांडगे आणि राहुल कुल यांच्याकडे भाजपच्या आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे.
हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
भाजपच्या आमदारांची विमानाची तिकिटे आणि नियोजनाची जबाबदारी राणे, लांडगे आणि कुल यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांना घेऊन हे नेते सोमवारी गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजारी आहेत. त्यामुळे गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा चार्ज आहे. बंडखोर आमदार सुरत, गुवाहाटीनंतर आता गोव्यात येऊन राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा तिथे दावा करू शकतात.
सेनेच्या ‘या’ 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस; विधानसभा उपाध्यक्षांनी सोमवारपर्यंत दिला वेळ
दरम्यान, शिंदे यांच्या गटात आता 50 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे हा दावा खरा ठरला आणि भाजप आणि शिंदे गटाने राजभवनात संख्याबळ दाखवलं तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार आहे. त्यामुळे सुत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also:
- पत्रकारांना चकवा देत ‘एकनाथ शिंदे’ काल गुजरातमध्ये; फडणवीससोबत चर्चा झाल्याची माहिती
- देवा लवकर आटप रे हे सगळं..! हॅाटेलचे बिल वाढतेय; दिपाली सय्यदचा खोचक टोला
- “अजित दादांनी शिवसेनेचा निधी थांबवण्याचं काम केलं”;श्रीकांत शिंदेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- लक्षात ठेवा..! शिंदे साहेबांमुळे शांत बसलो आहे; ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
- “राष्ट्रवादी- काॅंग्रेसकडून शिवसेना हायजॅक, आम्ही अजूनही शिवसेनेतच”; बंडखोर आमदार दिपक केसरकर