मुंबई : बंडखोरीनंतर आता दोन ते तीन दिवस उलटून गेले तरी शिवसेनेचे आमदार अजूनही गुवाहाटीतच आहेत. शिंदे गटाच्या भुमिकेनंतर आता महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. मात्र सरकार स्थापन करण्याचा दावा अजूनही भाजपने केला नाही. अशातच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट गुजरातमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे.
हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
कामाख्या देवीचं दर्शनासाठी मंदिरात जात असल्याचं सांगत एकनाथ शिंदे हे गुवाहाटीतील हॉटेलमधून बाहेर पडले. याची माहिती प्रसार माध्यमांना लागली. मात्र एकनाथ शिंदे हे चार्टर्ड विमानानं गुजरातमध्ये गेल्याची माहिती समोर येत आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील गुजरातमध्ये काल होते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट काल गुजरातमध्ये झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सेनेच्या ‘या’ 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस; विधानसभा उपाध्यक्षांनी सोमवारपर्यंत दिला वेळ
राष्ट्रीय माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की, काल देवेंद्रजी हे इंदूरला गेले होते. दुसरी चर्चा अशी आहे की, काल मुंबईवरून 1 चार्टर्ड विमान संध्याकाळच्यावेळी गुजरातच्या बडोदा येथे गेले होते आणि पहाटे ते विमान परत मुंबई एअरपोर्टला आले. त्यात देवेंद्रजी होते किंवा नव्हते? हे माहीत नाही. काल रात्री साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान गुवाहाटी विमानतळावरून एका चार्टर्ड विमानाने बडोद्यासाठी उड्डाण भरली होती आणि सकाळी सात साडेसात वाजताच्या दरम्यान ते विमान पुन्हा एकदा गुवाहाटी विमानतळावर परत आले. अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी; नवनीत राणांची अमित शहांकडे मागणी
एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एकनाथ शिंदे आपल्या पाठीमागे महाशक्ती आहे. तसेच राष्ट्रीय पक्ष देखील असल्याने काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. असंही एकनाथ शिंदे म्हणताना दिसत आहे. त्याचबबरोबर एकनाथ शिंदे यांनी जर भाजपसोबत युती केल्यास त्यांनी 8 कॅबिनट. 12 राज्यमंत्री आणि केंद्रात 2 मंत्रिपद देखील मिळणार असल्याची माहिती समोर आली.
Read also:
- देवा लवकर आटप रे हे सगळं..! हॅाटेलचे बिल वाढतेय; दिपाली सय्यदचा खोचक टोला
- “अजित दादांनी शिवसेनेचा निधी थांबवण्याचं काम केलं”;श्रीकांत शिंदेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- लक्षात ठेवा..! शिंदे साहेबांमुळे शांत बसलो आहे; ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन
- “राष्ट्रवादी- काॅंग्रेसकडून शिवसेना हायजॅक, आम्ही अजूनही शिवसेनेतच”; बंडखोर आमदार दिपक केसरकर
- “गद्दारांना शिवसेनेत पुन्हा जागा नाही, शिवसेना निखार, पाय ठेवाल तर जळाल”