मुंबई : सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी गावरान भाषेत संवाद साधला. त्यामुळे ते सध्या ट्रेडिंगवर असून त्याबाबत अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अशातच आता त्यांच्या या गावरन भाषेवर संजयर राऊतांनी चांगलाचं फटकारलं आहे.
“राष्ट्रवादी- काॅंग्रेसकडून शिवसेना हायजॅक, आम्ही अजूनही शिवसेनेतच”; बंडखोर आमदार दिपक केसरकर
एक आमदार म्हणला काय झाडी, काय हाटील, काय डोंगर, काय पाणी, मग महाराष्ट्रात स्मशान आहे का? तिथे झाडी, फुलं निसर्ग, दगडं, पाणी आहे, मग तुमच्या महाराष्ट्रात काय आहे. असं म्हणत संजय राऊतांनी शहाजी पाटलांवर संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत. असंही म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना सुनावलं आहे.
“गद्दारांना शिवसेनेत पुन्हा जागा नाही, शिवसेना निखार, पाय ठेवाल तर जळाल”
शहाजी पाटील आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रफिख शेख यांच्यात संवाद झाला. त्यात ते म्हणताहेत की, सगळं ठरलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. तसेच तुम्ही सध्या कुठे आहेत? असं विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, सध्या आम्ही गुवाहाटीत आहेत. काय ती झाडी, काय ते हाटील, काय तो डोंगर एकदम ओके आहे. त्यानंतर हा त्यांचा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावावर मत मागा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आज सहावा दिवस असून अजूनही ते गुवाहाटीत आहेत. मात्र आता भाजपकडून देखील हालचाली सुरू केल्या असून सोमवारी भाजपचे आमदार आणि बंडखोर आमदार गोव्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण झाल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंह यांच्याकडून गोव्याच्या राज्यपालांकडे राज्याचा प्रभारी कारभार सोपवला आहे. त्यामुळे भाजप आणि बंडखोर आमदार गोव्यातच सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.
Read also:
- बंडखोर आमदारांची सुरत, गुवाहाटीवरून आता गोव्यात स्वारी; भाजपच्या 3 नेत्यांकडे जबाबदारी ?
- पत्रकारांना चकवा देत ‘एकनाथ शिंदे’ काल गुजरातमध्ये; फडणवीससोबत चर्चा झाल्याची माहिती
- देवा लवकर आटप रे हे सगळं..! हॅाटेलचे बिल वाढतेय; दिपाली सय्यदचा खोचक टोला
- “अजित दादांनी शिवसेनेचा निधी थांबवण्याचं काम केलं”;श्रीकांत शिंदेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
- लक्षात ठेवा..! शिंदे साहेबांमुळे शांत बसलो आहे; ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन