चंद्रपूर: केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातुन ड्रीम प्रोजेक्ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. परंतु औद्योगिकदृष्टया महत्वाच्या असलेल्या बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आलेला नाही. आमदार सुधीर मुनगंटीवार यांची नितीन गडकरीना निवेदनादूवारे मागणी करण्यात आली आहे
हे पण वाचा: आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले; राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही – धनंजय मुंडे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विभागावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पात त्यांनी बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश करावा अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश या प्रस्तावित प्रकल्पामध्ये त्वरीत करण्याचे आश्वासन ना. गडकरी यांनी यावेळी दिले.
हे पण वाचा: काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान, ‘ठाकरे सरकारच रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हातात’
सुधीर मुनगंटीवार यांनी (दि. १५) जुलै रोजी आ. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले व चर्चा केली. ब्रॉडगेज मेट्रो या प्रकल्पात बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी प्रतिपादीत केली. बल्लारपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. भारताच्या विभीन्न भागातून महत्वपूर्ण रेल्वे बल्लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्लारपूर आणि चंद्रपूर येथील दोन्ही रेल्वे स्थानके रेल्वे विभागाच्या सर्वोत्तम रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत देशात अव्वल ठरली आहेत.
हे पण वाचा: लोक जेव्हा मला शिव्या देत होते, त्या काळात शरद पवारांनी विरोधीपक्ष नेता केले
या दोन्ही शहरांचा समावेश या प्रकल्पात झाल्यास या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमीका आ. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. सदर प्रस्तावित प्रकल्पात बल्लारपूर व चंद्रपूर या शहरांचा समावेश करण्यात येईल असे आश्वासन ना. नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. यावेळी फेडरेशन ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चंद्रपूर चे पदाधिकारी रामजीवन परमार ,दिनेश नथवाणी, सुमेध कोत्तपल्लीवार , दिनेश बजाज, अनिल टहलीयानी यांची उपस्थिती होती.