पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशात हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना आपल्या घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे कार्यकर्ते लहु बालवडकर यांनी जवळपास पाच हजार तिरंग्या झेंड्यांचं वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पुण्यातील इतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील या अभियानात सहभाग घेतला.
“शिरसाठांचे ट्विट म्हणजे त्यांच्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ होता”; शिंदे गटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
लहु बालवडकर यांनी पुण्यातील शाळा, खाजगी संस्था, तसेच विविध कार्यालयामध्ये जाऊन तिरंगा वाटप केला. पुण्यातील बावधान, पाषाण, म्हाळुंगे तसेच बालेवाडी याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिरंग्याचे वाटप केले.
“सरकार आलं आहे, मंत्रिपद आल्यास, थांबणार नाही, झुकणार नाही, आता माझ्याकडे वेळच वेळ;
हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरुवात 13 ऑगस्ट पासून राज्यभरात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातही हर घर तिरंगा अभियानाचे जोरदार स्वागत झाले असल्याचे दिसून येत आहे. भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आपल्या घरी तिरंगा फडकवत देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या, जीवाची बाजी लावणाऱ्या आणि ज्यांनी या देशाचे स्वातंत्र्य मिळवून दिले त्या सर्व सैनिकांच्या बलिदानाचे यावेळेस स्मरण केले.
“ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे दादरलाच उभारणार प्रति शिवसेना भवन”
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू झाले आहे. याची सुरुवात स्वतःपासून करत भोसरीतील निवासस्थानी तिरंगा फडकावला. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम शहीदांचे, क्रांतिकारकांचे स्मरण केले. हर घर तिरंगा या अभियानातून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे यानिमित्ताने शहरातील प्रत्येक नागरिक स्मरण करणार आहे असे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
Read also
- उद्योगनगरी तिरंगामय..! ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेतून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे स्मरण : महेश लांडगे
- “तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील”; गडकरींचं सुचक वक्तव्य
- “शहीद होऊन अमर तरी झाला असता बाळासाहेबांसाठी नाही तर आनंद दिघेंसाठी”
- शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचा फायदा! केंद्रात सेनेच्या ‘या’ दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद
- मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा