मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेले ट्विट हे तांत्रिक चुकीमुळे नव्हते. तर तो त्यांचा अंतरात्म्याचा आवाज होता, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला. आमदार संजय शिरसाट यांच्याप्रमाणेच शिंदे गटातील अनेक आमदारांना आपण चूक केली असल्याचे वाटायला लागलं आहे, असं म्हणत महेस तपासे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
“उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं वक्तव्य येणार नाही, भावनिकरित्या कुटुंबांशी जोडलोय”; धैर्यशीलराव माने
ट्विट डिलीट करून लगेच ते तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे आमदार संजय शिरसाट सांगत असले तरी त्यांच्या चेहर्यावरील भाव आणि देहबोली खूप काही स्पष्ट करत होती. बंडखोर आमदारांना सत्तेचे आमिष दाखवून घेण्यात आल्याचे कारस्थान भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असल्याचं आमदार संजय शिरसाट यांच्या ट्विटवरून दिसून येते, असा थेट आरोप महेश तपासे यांनी करत. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहे, असंही महेश तपासे म्हणाले.
“काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप असणारा नगरसेवक राष्ट्रवादीत”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्या मंत्रिमंडळ विस्तारावरती काही बंडखोर आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांच्या एका ट्विटमुळे शिंदे गटातील नाराजी उघड झाली आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत, असं ट्विट संजय शिरसाट यांनी केलं होते. कालांतराने ते ट्विट त्यांच्या अकाउंटवरून डिलीट करण्यात आले. त्यानंतर संजय शिरसाठ यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
“आता गावोगावी गुलाल उधळणार, 608 ग्रामपंचायतींमध्ये जनता सरपंच निवडणार” निवडणुका जाहीर
याचबरोबर, आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे हे आहेत. तो जो आदेश देतील तोच आम्हाला मान्य राहील. मला निश्चित असं वाटत होतं की आपण या उठावामध्ये साथ दिली. त्यामुळे मला सुद्धा मंत्रिपद मिळेल. या ट्विटमुळे नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर अशा भूमिकेत मी आलेलो आहे. यातुन एकादा चुकीचा मॅसेज जातो आणि तो व्हायरल होतो. यातुन माझ्या राजकारणावर आणि इमेवर देखील फरक पडतो, असंही संजय शिरसाठ म्हणाले.
Read also
- “सरकार आलं आहे, मंत्रिपद आल्यास, थांबणार नाही, झुकणार नाही, आता माझ्याकडे वेळच वेळ;
- “ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे दादरलाच उभारणार प्रति शिवसेना भवन”
- “रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”
- “आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
- “नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव