मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा ठोकला आहे. यानंतर आता शिवसेना नक्की कोणाची, धनुष्यबान कुणाचा आणि शिवसेना भवन कोणाचं असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आल्या आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे मुंबईमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
“आता गावोगावी गुलाल उधळणार, 608 ग्रामपंचायतींमध्ये जनता सरपंच निवडणार” निवडणुका जाहीर
एकनाथ शिंदे प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत नाहीत ना? असा प्रश्न विचारला असता आमदार सदा सरवणकर म्हणाले की, खरी शिवसेना आम्हीच आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. राज्यातून त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येतात. त्यासाठी एखाद कार्यालय हवं. त्यामुळे दादरमध्ये एखादं कार्यालय हवं असं आमचं मत आहे. कार्यालय निश्चित असेल तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटतात. कार्यालयाचं नाव काय ठेवायचं ते नंतर ठरवलं जाईल पण दादरच्या मध्यवर्ती ठिकाणी कर्यालय असावं अशी इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांची आहे, असं सदासरवणकर यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना यापेक्षाही…;”
ठाकरेंनी मुंबईत आव्हान देण्यासाठी शिंदे गट दादरमध्ये नवे शिवसेना भवन उभारणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या कार्यालयासाठी दादरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी जागेचा शोध सुरू असल्यांची ही माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. मात्र यावरून राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधाला आहे. प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत.
“100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”
मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावं यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता आणि उद्याही राहील, असं कॅबिनेट मंत्री उद्य सामंत यांनी म्हटलं आहे.
Read also
- “रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”
- “आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
- “नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव
- “उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं वक्तव्य येणार नाही, भावनिकरित्या कुटुंबांशी जोडलोय”; धैर्यशीलराव माने
- “काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप असणारा नगरसेवक राष्ट्रवादीत”