मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्या मंत्रिमंडळ विस्तारावरती काही बंडखोर आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांच्या एका ट्विटमुळे शिंदे गटातील नाराजी उघड झाली आहे. उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत, असं ट्विट संजय शिरसाट यांनी केलं होते. कालांतराने ते ट्विट त्यांच्या अकाउंटवरून डिलीट करण्यात आले. त्यानंतर संजय शिरसाठ यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
“100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे. झालेली चुक त्यांना माहीत असली तरी त्यांना माहित आहे की संजय शिरसाट असं करू शकत नाही. उद्धव ठाकरे हे त्यावेळीचे कुटुंबप्रमुख होते, आमची त्यावेळी भूमिका वेगळी होती, उद्धव ठाकरे यांनी सर्व सोडून पक्षप्रमुख म्हणुन राहावं याचबरोबर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करू नये अशी भूमिका असताना केलेलं ते ट्विट होते. ते ट्विट आत्ता फॉरवर्ड झालं आहे. मला मंत्रिपद मिळालं किंवा नाही मिळालं या हेतुने हे ट्विट केलं नाही. प्रत्येकाला मंत्रिपद हवं असतं, मला भेटलं नाही म्हणुन मी बंड करेन किंवा कोणाला भेटायला जाईन अशी कल्पना देखील डोक्यात करू नका. असं म्हणत संजय शिरसाठ यांनी एकप्रकारे इशारा दिला आहे.
“आमदार पुण्याचे, मंत्री पुण्याचे अन् ध्वजारोहण कोल्हापुरला..?”चंद्रकांत पाटलांवर पुणेकरांचा संताप
आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे हे आहेत. तो जो आदेश देतील तोच आम्हाला मान्य राहील. मला निश्चित असं वाटत होतं की आपण या उठावामध्ये साथ दिली. त्यामुळे मला सुद्धा मंत्रिपद मिळेल. या ट्विटमुळे नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर अशा भूमिकेत मी आलेलो आहे. यातुन एकादा चुकीचा मॅसेज जातो आणि तो व्हायरल होतो. यातुन माझ्या राजकारणावर आणि इमेवर देखील फरक पडतो, असंही संजय शिरसाठ म्हणाले.
“जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री झालो, पण अजून माझ्या गावात रेल्वे नाही”
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी नंदनवनला गेलो होतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मंत्रिपदावर चर्चा झाली होती. शेवटी यादी फायनल झाली. त्यावेळी मी त्यांच्याशी बोललो. शिंदे यांनी सर्वांशी चर्चा केली आणि यादी तयार केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात हे वक्तव्य नाही, असं सांगतानाच मंत्रिपदासाठी मी असल्या कुठ्ल्याही आयडिया लावत नाही. मी माझी नाराजी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना बोलून दाखवली आहे. मला कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा आहे आणि शिंदे साहेब देतील, असं शिरसाट म्हणाले.
Read also
- “नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव
- “उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं वक्तव्य येणार नाही, भावनिकरित्या कुटुंबांशी जोडलोय”; धैर्यशीलराव माने
- “काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप असणारा नगरसेवक राष्ट्रवादीत”
- “आता गावोगावी गुलाल उधळणार, 608 ग्रामपंचायतींमध्ये जनता सरपंच निवडणार” निवडणुका जाहीर
- पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना यापेक्षाही…;”