मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये झालेल्या युतीमुळे शिंदे यांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 12 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यातील दोन खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
“आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
शिवसेनेच्या 12 खासदारांनी बाहेर पडत शिवसेना ही एनडीएचाच भाग असल्याचा दावा केला. या सोबतच खासदारांनी गटनेते पदी राहूल शेवाळे यांची निवड केली. तर भावना गवळी या प्रतोद आहेत. 12 खासदारांपैकी दोन जणांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. यामध्ये दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आणि शिंदे गटाला पहिल्यांदा पाठिंबा दर्शवणारे राहूल शेवाळे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचंही नाव मंत्रिपदाच्या यादीत असण्याची शक्यता आहे.
“नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला केंद्र सरकारमध्ये एक केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले होते. मात्र शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपशी युती तोडत काँग्रेस, राष्टवादी सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यामुळे शिवसेनेने ते मंत्रिपद सोडले. त्यावेळी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांना शिवसेनेने दिलं होते. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजिनामा दिला.
“उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं वक्तव्य येणार नाही, भावनिकरित्या कुटुंबांशी जोडलोय”; धैर्यशीलराव माने
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये हेमंत गोडसे, राजेंद्र गावित, धैर्यशिल माने, संजय मंडलिक, सदाशीव लोखंडे, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, रामटेक हेमंत पाटील या खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
Read also
- मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा
- “शिरसाठांचे ट्विट म्हणजे त्यांच्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ होता”; शिंदे गटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “सरकार आलं आहे, मंत्रिपद आल्यास, थांबणार नाही, झुकणार नाही, आता माझ्याकडे वेळच वेळ;
- “ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे दादरलाच उभारणार प्रति शिवसेना भवन”
- “रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”