नागपुर : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त बावनकुळे यांचा सत्काराचा कार्यक्रम नागपुर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते. यावेळी गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढेच मुख्यमंत्री होतील. यामुळे आता राज्यात याविषयी एकच चर्चा रंगली आहे.
“ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे दादरलाच उभारणार प्रति शिवसेना भवन”
भारतीय जनता पक्षाचा जो प्रदेशाध्यक्ष होतो तो पुढे काय होतो. बावनकुळे, मुख्यमंत्री पदासाठी तुम्हाला शुभेच्छा देत नाही बरं. असं म्हणत गडकरी यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुचक वक्तव्य केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, अडचण याची आहे की जे बोललो नाही ते माझ्या नावाने मीडियावाले खपवतात. अरे हिम्मत असेल तर तुमच्या नावाने छापा, माझ्या का नावाचा उपयोग करता? उद्या गडकरींचा फडणवीस यांना संदेश असं छापून येईल. मुख्यमंत्री फडणवीस झाले पाहिजेत अस म्हणत त्यांनी जर फडणवीस केंद्रात गेले तर मुख्यमंत्रीपदासाठी बावनकुळे साहेब तुमचाही विचार होऊ शकतो, अशी शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवली.
“रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”
बावनकुळे यांच्या खाजगी आयुष्यावर बोलताना गडकरी यांनी त्यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली. ते म्हणाले की, काही कार्यकर्ते मेहनत करून पुढे येतात तर काही मागच्या दारातून येतात. बावनकुळे खुप मेहनत करून पुढे आले आहेत. त्यांनी बायको पळवून आणली. बावनकुळे तेली समजाचे आहेत आणि त्यांची बायको कुणबी समाजाची आहे, अस म्हटल्यावर उपस्थितीत असलेल्या सभागृहात एकच हश्श्या पिकला.
“आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
बावनकुळे यांनी ऊर्जा खात्यात मोठं काम केलं आहे. विजेचे कनेक्शन शेतकऱ्यांना मिळत नव्हती. मात्र त्यांनी ती मिळवुन दिली. बावनकुळेंमध्ये एवढे कर्तुत्व आहे की, ते केव्हा माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील हे सांगता येत नाही. म्हणजे कुठलं काम कसं करायचं आणि निधी मिळवायचा हे त्यांना कळतं, असं म्हणत देखील त्यांनी बावनकुळेंबाबत मिश्किल टिपण्णी केली.
Read also
- “शहीद होऊन अमर तरी झाला असता बाळासाहेबांसाठी नाही तर आनंद दिघेंसाठी”
- शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचा फायदा! केंद्रात सेनेच्या ‘या’ दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद
- मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा
- “शिरसाठांचे ट्विट म्हणजे त्यांच्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ होता”; शिंदे गटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “सरकार आलं आहे, मंत्रिपद आल्यास, थांबणार नाही, झुकणार नाही, आता माझ्याकडे वेळच वेळ;