नवीदिल्ली : भाजपाच्या एका मंत्र्यांनी सरकारी गाडीवर उलटा तिरंगा लावल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला जात असताना गाडीवर उलटा तिरंगा पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांच्या सरकारी गाडीवर झेंडा लावला होता. मात्र तो उलटा होता. मिळालेल्या माहितीनुसार, देवास येथे एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.
उषा ठाकूर यांच्याकडून चूक मान्य
उषा ठाकूर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र त्यांच्या सरकारी गाडीवर उलटा तिरंगा लावल्याची बाब प्रसारमाध्यमांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने ही गोष्ट मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर सुरुवातीला ठाकूर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र माफी मागितली. तसेच त्यानंतर सरकारी गाडीवर लावण्यात आलेला उलटा तिरंगा त्यांच्या ड्रायव्हरने सरळ केला. उषा यांची गाडी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आली होती. देवासमध्ये जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून तेव्हा ठाकूर यांनी चूक मान्य केली.
Read also
PM मोदींच्या जन्मदिवसाच्या दिवशी मोठा अपघात ! भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी | VIDEO |https://t.co/hTkxzSjWat#PMModiBirthday #BJP #PMO
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 19, 2020