नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. गेल्या २ महिन्यांपासून त्यांचा पत्ता लागत नाही आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा पत्ता जाणून घेण्यासाठी सीबीआयने एक नवीन शक्कल लढवली आहे. देशमुख यांच्य नागपुरातल्या घरी सीबीआयचे पथक दाखल झाले आहेत. एकूण ५ ते ६ अधिकारी देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत.
बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; महाराष्ट्र बंदवरून अशिष शेलारांचा हल्लाबोल
सकाळी आठच्या सुमारास सीबीआयचे पथक देशमुख यांच्या नागपूर येथील निवास्थानी दाखल झाले. त्यांच्याकडे अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचे वॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांना वारंवार नोटीस पाठवून देखील ते चौकशीसाठी समोर आले नाहीत.
मुंबईत बेस्ट’च्या ८ बसेसची तोडफोड; ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण
लूक आऊट नोटीस बजावल्यानंतरही अनिल देशमुख समोर आले नाहीत. त्यामुळे आता सीबीआयने त्यांचा मोर्चा अनिल देशमुख यांचा मुलगा आणि सुन यांच्याकडे वळवला आहे. सीबीआयचे पाच ते सहा अधिकारी सकाळी आठ वाजता अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे त्यांच्या संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात 4 कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे आता मुलाला आणि सुनेला अटक झाली तर अनिल देशमुख समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान सीबीआयचे दोन अधिकारी अनिल देशमुख यांच्या घराबाहेर निघाले असून एका अधिकाऱ्याच्या हातात सरकारी लिफाफा होता. सात अधिकाऱ्यांकडून अजूनंही तपासणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Read Also :
- शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंनी भाजपला फटकारले
- एवढाच शेतकऱ्यांचा पुळका असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा – मनसे
- उद्धवजी, शिवसेनेच्या जीवावर राष्ट्रवादी मोठी होत आहे, महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला – चंद्रकात पाटील
- भाजप नेत्या पंकजा मुंडे राज्यापाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला; राजकीय तर्कवितर्कांना उधान
- शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर; चेंबूर येथे वाहतूक रोखली, दुकाने बंद करण्याचे आवाहन