पुणे : भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगावमध्ये एकच उत्सव पहायला मिळाला. मात्र भाजपने यावर सावध प्रतिक्रिया दिल्याचे पहायला मिळाले. एकनाथ खडसे यांनी यावेळी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आता एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बरं नाथा ती बैलगाडी कुठंय…ज्यात सिंचनाचे कागद घेऊन फिरत होते असा सवाल माजी राज्यमंत्री भेगडे यांनी एकनाथ खडसे यांना विचारला आहे. बाळा भेगडे यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.
ज्यावेळी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंचन घोटाळा बाहेर आला होता त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले एकनाथ खडसे यांनी सिंचन घोट्याळ्याचे बैलगाडीभरून पुरावे असल्याचे म्हंटले होते आता तेच खडसे राष्ट्रवादीत गेल्याने अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतील म्हणून बाळा भेगडे यांनी नाथाभाऊ ते सिंचनाचे बैलगाडीभरून ठेवलेले पुरावे नेमके कोठे आहेत असा सवाल विचारला आहे.
बरं नाथा ती बैलगाडी कुठंय…
ज्यात सिंचनाचे कागद घेऊन फिरत होते …@BJP4Maharashtra @PravinAlai @TheRSS_Piyussh pic.twitter.com/804FtW8y09— Bala Bhegade- बाळा भेगडे (@BalaBhegade) October 25, 2020
Read Also
आमदार महेश लांडगे यांच्याकडून महाराष्ट्र प्रेस क्लबमध्ये निवड झालेल्या पत्रकारांचे अभिनंदनhttps://t.co/eTs1GZXR5F#Mlamaheshlandage #BJP @maheshklandge
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020