जळगांव : भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांचे पथक जळगावात हाऊस सर्च साठी दाखल झाले आहे. विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी ही चौकशी होणार आहे. यामुळे महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मुख्यमंत्री अजून हॉलिडे मूडमध्येच, राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये का? चित्रा वाघ कडाडल्या
पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबलं असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महिलांबद्दल बोलताना सर्वांनीच काळजी घ्यावी; देवेंद्र फडणवीसांचा सर्वपक्षीय नेत्यांना मोलाचा सल्ला
जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादात दाखल गुन्ह्यावरून हे छापे टाकण्यात आल्याचं कळतंय. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. नंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे. अॅड. विजय पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगावातील भोईटे कुटुंबीयांसह इतरांच्या घरी आज सकाळीच पुणे पोलिसांची कारवाई सुरू आहे, अशी माहिती आहे.
Read also:
- शाळा बंद झाल्या, आता दारुची दुकानं बंद होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
- देशात कोरोनाचे थैमान, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; काय निर्णय घेणार?
- कोरोनाचे दूत बनू नका, नव्या नियमावलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती…
- पुरंदर विमानतळासाठी जुन्या जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला मान्य आहे का? चंद्रकांत पाटीलांचा सवाल
- गोवा आणि युपीमध्ये शिवसेना रणशिंग फुंकणार? संजय राऊतांनी निवडणुकीच गणित सांगितलं