मुंबई : मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होताना दिसत आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 4.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांसह काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; कोट्यावधीची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप
भारतात दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या आता 1 लाखांचा टप्पा ओलांडत आहे. त्यामुळे आता पंतप्रधान एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 1,59,632 नव्या कोरनोा बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे देशात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 5,90,611 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
माझ्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार अधिकारी भाजपाचाच दलाल; मंत्री अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप
भारतातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अदिक जाला आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहिम सुद्धा वेगाने सुरू आहे. भारतात आतापर्यंत 151.58 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; १४ फेब्रुवारीपासून सात टप्प्यांमध्ये होणार निवडणुका
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. काय उपाययोजना राज्यांकडून सुरू आहेत तसेच आणखी काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंथन होणार आहे.
पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ खेडमध्येच होण्यासाठी आमदार लांडगे यांची ‘वज्रमूठ’
सात दिवसांपूर्वी देशात कोरोनाची 27,553 इतक्या रुग्णांची नोंद झाली होती जी संख्या आता वाढून 1.6 लाख इतकी जाली आहे. इतक्या झपाट्याने होत असलेल्या रुग्णवाढीमुळे चिंतेचे वातवावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी 24 डिसेंबर रजोी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणारी एक बैठक घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करत सावध राहण्याच्या सूचनांवर भर दिला होता.
Read also:
- कोरोनाचे दूत बनू नका, नव्या नियमावलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती…
- पुरंदर विमानतळासाठी जुन्या जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला मान्य आहे का? चंद्रकांत पाटीलांचा सवाल
- गोवा आणि युपीमध्ये शिवसेना रणशिंग फुंकणार? संजय राऊतांनी निवडणुकीच गणित सांगितलं
- महिलांबद्दल बोलताना सर्वांनीच काळजी घ्यावी; देवेंद्र फडणवीसांचा सर्वपक्षीय नेत्यांना मोलाचा सल्ला
- मुख्यमंत्री अजून हॉलिडे मूडमध्येच, राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये का? चित्रा वाघ कडाडल्या