औरंगाबाद : महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि मंत्री ‘ईडी’च्या रडारवर आले असतानाच आता, शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कोट्यवधी रुपायांची बेनामी मालमत्ता जमावल्याचा आरोप करत त्यांच्याच मतदार संघातील एका माहिती कार्यकर्त्याकडून ‘ईडी’कडे तक्रार करण्यात आली आहे. तर यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो तक्रारदार भाजपचा दलाल असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे.
भाजप आमदार आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; कुटूंबही संपवण्याचा दिला इशारा
सत्तार म्हणाले, काही बाजू नाही त्यात, आत्तापर्यंत त्या व्यक्तीने एक हजार तक्रारी केल्या आहेत. भाजपचा दलाल आहे तो, झिरो माणूस असून, त्यावर काय प्रतिक्रिया देणार, असं म्हणत सत्तार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. पण या तक्रारीनंतर आता ईडी काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्वाचे ठरेल.
शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; कोट्यावधीची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप
अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपल्ली यांनी ईडीकडे तक्रार करताना म्हटले आहे की, ‘अब्दुल सत्तार यांच्या गुन्हेगारी (पार्श्वभूमी), प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आर्थिक गैरप्रकार, शैक्षणिक संस्थेमधील घोटाळे, कोट्यावधीची अपसंपदा, बेनामी मालमत्ता, उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती, अवैध व्यवसाय आदी बाबत माझ्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार कायदेशीर लेखी तक्रार करत असल्याचं म्हटले आहे. सोबतच अब्दुल सत्तार यांच्याविरोधातील वेगवेगळ्या घोटाळ्या आणि तक्रारीबाबत ७८४ पानांचे पुरावे सुद्धा माझ्याकडे असून ते ईडी कार्यालयात सादर केल्याचा दावा शंकरपल्ली यांनी केला आहे.
Read also:
- …तर अशा पंतप्रधानांचा काय फायदा; मंत्री विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
- जयदत्त अण्णांचा पुतण्याला धक्का; संदीप क्षीरसागरांना काकांच्या विरोधात साधा उमेदवारही देता आला नाही
- आशिष शेलार सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलतात, म्हणून त्यांना धमकी; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- २२ फेब्रुवारीला यशवंत ब्रिगेडचा मंत्रालयावर महामोर्चा धडकणार; काय आहे नेमकी मागणी?
- येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा