बीड : बीडमधील काका पुतण्याचा संघर्ष मागच्या विधानसभेपासून संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आहे. पुतण्या संदीप क्षीरसागरने थेट विधानसभेत मंत्री असणाऱ्या काकांना काही मतांनी लोळून टाकलं. निवडणूक प्रचारात थेट कपडे फाडण्याची देखील भाषा पुतन्याकडून करण्यात आली होती.
काही दिवस शांत आणि संयम बाळगणाऱ्या जयदत्त अण्णांनी आता मात्र पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांना आपला राजकीय हिसका दाखवला आहे. बीड तालुका दुध संघावर जयदत्त क्षीरसागरांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.या निवडणुकीमुळे जयदत्त अण्णा पुन्हा एकदा बीडच्या सहकार क्षेत्रातील तालुका दुधसंघ निवडणुकीत भारी ठरले आहे.
विद्यमान आमदार असणाऱ्या संदीप क्षीरसागर यांना आपल्या पक्षाकडून तालुका दुध संघाच्या निवडणुकीत उमेदवार देखील उभा करता आले नाहीत. त्यामुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणूक थेट बिनविरोध जिंकली असून दूध संघावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काका पुतण्याला भारी ठरल्याचे चित्र समोर आले आहे.
विकासकामांमध्ये टक्केवारी खाण्याची पीएचडी झालेल्यांची माझ्यावर बोलायची लायकी नाही – राजू पाटील
बीड मतदार संघात तालुका दूध संघ ही अत्यंत महत्वाची मानली जाणारी संस्था आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विजयानंतर म्हणाले की दूध संघाच्या स्थापनेपासून लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवलाय, दुधावर प्रक्रिया करत ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचा फायदा होईल, या अनुषंगाने काम करत आहोत. आगामी काळातही आमच्याकडून हे कार्य चांगल्या पद्धतीने सुरु राहणार आहे. या निवडणुकीनंतर आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकांमध्ये काका-पुतण्या भारी ठरणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- आशिष शेलार सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलतात, म्हणून त्यांना धमकी; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- २२ फेब्रुवारीला यशवंत ब्रिगेडचा मंत्रालयावर महामोर्चा धडकणार; काय आहे नेमकी मागणी?
- येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा
- शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; कोट्यावधीची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप
- भाजप आमदार आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; कुटूंबही संपवण्याचा दिला इशारा