मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी देण्यात आली. आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी देण्यात येते आहे. आशिष शेलार नेहमी सरकार विरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्ट्राचार ते काढत असतात, यामुळेच त्यांना धमकी दिली गेली असावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
धमकी मिळाल्यानंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती शेलार यांनी पोलिसांना केली आहे. २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. शेलार यांनी अनोळखी नंबरवरून धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
आशिष शेलार हे भाजपचे प्रमुख नेते आहे. त्यांना यापूर्वी देखील धमकी मिळाली होती. शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील आणि कारवाई करण्याची मागणी करतील, असं समजते. आशिष शेलार नेहमी सरकारविरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्ट्राचार ते काढत असतात. त्यामुळे त्यांना ही धमकी आली असेल. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read also:
- २२ फेब्रुवारीला यशवंत ब्रिगेडचा मंत्रालयावर महामोर्चा धडकणार; काय आहे नेमकी मागणी?
- येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा
- शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार; कोट्यावधीची बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप
- भाजप आमदार आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; कुटूंबही संपवण्याचा दिला इशारा
- विकासकामांमध्ये टक्केवारी खाण्याची पीएचडी झालेल्यांची माझ्यावर बोलायची लायकी नाही – राजू पाटील