मुंबई : भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे समोर आले. या प्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
“एसटी आंदोलनामुळं 600 कोटींचं नुकसान; ST खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या”
भाजप नेते आशिष शेलार यांना यापूर्वीदेखील धमकी देण्यात आली होती. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना एका अज्ञात व्यक्तीकडून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. फोनवरून धमकी देणारी व्यक्ती ही अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यांनी धमकी येणाऱ्या दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर दगडफेक झाली; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जावई शोध
तर त्यापूर्वी एका अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा अतिरेक्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. या धमकीबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.
‘डान्सिंग डॉल’ची उपमा देणं पडलं महागात; अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा
आशिष शेलार सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात आणि सरकारचा भ्रष्टाचार, सरकारमधला अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणतात, संघर्ष करतात. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Read also:
- विकासकामांमध्ये टक्केवारी खाण्याची पीएचडी झालेल्यांची माझ्यावर बोलायची लायकी नाही – राजू पाटील
- कोल्हापुरात सत्तारूढ गटातील ज्या नेत्यांमुळे पराभव झाला त्यांना किंमत चुकवावीच लागणार; विनय कोरेंचा इशारा
- पंतप्रधानांविषयी कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेपाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा – चंद्रकांत पाटील
- धनंजय मुंडेविरोधात कोणतीही निवडणूक लढवणार नाही; करुणा मुंडेचा ‘त्या’ वक्तव्यांवरून यु-टर्न
- संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे – चित्रा वाघ