मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांवर महिलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
काँग्रेसने कमरेखालचे वार करणं सोडून द्याव; पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरून विक्रांत पाटील कडाडले
“मूठभर महिलांची इज्जत ही इज्जत आणि बाकीच्या महिला कचरा हे महाराष्ट्रात चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक महिलेची डिग्निटी त्याठिकाणी जपली गेली पाहिजे. याच्यासाठी सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत. आजच मी राज्याच्या सन्माननीय गृहमंत्र्यांना पत्र दिलं आहे. जर एका माणसाने एका महिलेची केलेली बदनामी ही बदनामी होत असेल, तर सत्ताधारी पक्षातील कोणी दुसऱ्या महिलांवर केलेली बदनामी, त्यांचा बोलनं हे आक्षेपहार्य आणि आपत्तीजनक कसं असू शकणार नाही?”
कानून सभी केलिए एक है…
शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील ने सांसद हेमामालिनीजी केलिये जो शब्द इस्तेमाल किये क्या वह आपत्तीजनक नहीं थे?
शिवसेना सांसद संजयजी राऊत ने भाजपा के नेताओंको प्रसिद्धीमाध्यमों केसामने गाली दी क्या यह आपत्तीजनक नही है…
गृहमंत्री जी गुन्हा दर्ज करे pic.twitter.com/LKp1AZ7YWW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 6, 2022
त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही भाजपच्या लोकांचं समर्थन करत नाही, त्याच्यावर कारवाई केली ते योग्यच केली. मग गुलाबराव पाटीलांनी देशाच्या खासदार हेमा मालिनी यांच्याविषयी वक्तव्य केलं ते आपत्तीजनक नव्हतं ? ते विनयभंगामध्ये बसत नाही का ? शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी, यांनी सगळ्या प्रसिद्धी माध्यमांसमोर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना शिव्या दिल्या, त्या शिव्या घराघरांत पोहोचल्या, ते आपत्तीजनक नाही का ? त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. ही मागणी आम्ही केली आहे,” असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
Read also:
- ‘डान्सिंग डॉल’ची उपमा देणं पडलं महागात; अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा
- पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर दगडफेक झाली; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जावई शोध
- “एसटी आंदोलनामुळं 600 कोटींचं नुकसान; ST खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या”
- “मग सामनातून अग्रलेखातून रोज गरळ ओकणाऱ्या संपादकांना रोज अटक का होत नाही?”
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचा सत्तारूढ गटाला धक्का; आमदार प्रकाश आवाडेंचा पराभव