कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी राजकारण तापण्यास सुरुवात झाली होती. महाविकास आघाडीमध्ये उभी फूट या निवडणुकीदरम्यान पडली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज बंटी पाटलांनी वेगळी मोट बांधली होती. त्यांना आव्हान म्हणून शिवसेनेने देखील आपला विरोधी पॅनल घोषित केला होता.
माझं सोडा सत्तार यांना कोणीचं गांभीर्याने घेतं नाही; सत्तारांची पाठ फिरताच दानवेंनी सोडला टीकेचा बाण
आता निवडणुकीचा निकाल लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता कोल्हापूर जिल्हा बँकेवर येणार आहे हे निश्चित झाले असले तरी शिवसेनेने जो धक्का त्यांना दिला आहे तो धक्का खूप जबरदस्त आहे. आमदार प्रकाश आवडे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दलचा गाफीलपणा हा एक सुनियोजित कट; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप
सर्वाधिक चुरस ही शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात होती. माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेंद्र यड्रावकर यांना ९८ मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना ५२ मते पडली.
पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही; संजय राऊतांचा पंजाब प्रकरणावरून गंभीर इशारा
निवडणुकीत विकास संस्था गटात गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील, भुदरगडमधून विद्ममान संचालक व माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील, आजरातून सुधीर देसाई, शाहुवाडीतून रणवीरसिंह गायकवाड हे विजयी झाले आहेत. शाहुवाडीतून विद्ममान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर तर आजऱ्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यातील लढतीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दिवसेंदिवस या लढतेची धार वाढत होती. साखर कारखानदारांच्या विरोधात बंड पुकारणारे राजू शेट्टी हे थेट गणपत पाटलांच्या बाजूने उभे असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. अखेरीस राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मोठा विजय झाला आहे.
Read also:
- काँग्रेसने कमरेखालचे वार करणं सोडून द्याव; पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरून विक्रांत पाटील कडाडले
- सत्तार-दानवेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण; सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते संभ्रमात का?
- मोदींच्या पुण्याईमुळे निवडून येतात म्हणणाऱ्या भुजबळांवर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…
- सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊन नाही, रुग्ण वाढले तर कठोर पावलं उचलू – महापौर किशोरी पेडणेकर
- ‘घटिया सोच’ म्हणताच खासदार प्रियांका चारतुर्वेदींनी आमदार राम सातपुतेंना केलं ब्लॉक