मुंबई : मोदींच्या पुण्याईमुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं असून भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आहे? उगाच टिमकी वाजवायची नाही अशा शब्दांत सुनावलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीला जाऊन मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसोबतच वेगवेगळ्या मुद्द्यावंर भाष्य केलं.
“पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?”
मोदींच्या पुण्याईमुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं असून यावर बोलताना ते म्हणाले की, “भाजपा युवा मोर्चाच्या बैठकीत बोलताना मी कोणतीही परंपरा नसताना आयुष्यात मोठं व्हायचं आहे असं मी सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे आयतं मिळालं, तसं तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला परिश्रम करावे लागतील असा संदर्भ होता. आता तेवढंच एक वाक्य काढून बोलायचं असेल तर ठीक आहे”.
“सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत, आंदोलनाच्या नावावर त्यांनी वर्गणी गोळा केली”
“माझे वडील ना सरपंच होते ना ग्रामपंचाय सदस्य होते. भुजबळांना काय माहिती आहे? आयुष्यातील ऐन तरुणाईतील १३ वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं. मला माझी टीमकी वाजवण्याची सवय नाही भुजबळ. आम्ही एका वाडीत राहत असल्याने त्यांना ओळखतो. भुजबळांचा जो पालिकेचा वॉर्ड आहे तिथे आजही माझं घर आहे. आयुष्याची २० ते ३३ वर्षे मी संघटनेसाठी दिली. मी देशभरात प्रवास केला आहे. त्यामुळे भुजबळांनी मला शिकवू नये,” असंही यावेळी ते म्हणाले.
Read also:
- सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊन नाही, रुग्ण वाढले तर कठोर पावलं उचलू – महापौर किशोरी पेडणेकर
- ‘घटिया सोच’ म्हणताच खासदार प्रियांका चारतुर्वेदींनी आमदार राम सातपुतेंना केलं ब्लॉक
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही; संजय राऊतांचा पंजाब प्रकरणावरून गंभीर इशारा
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दलचा गाफीलपणा हा एक सुनियोजित कट; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप
- “एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जातोय”; पंजाबच्या मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचं मोठं विधान