मुंबई : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याने वाद निर्माण झाले होते. जितेन गजारिया यांनी आपल्या ट्विटद्वारे रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती.
“एसटी आंदोलनामुळं 600 कोटींचं नुकसान; ST खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या”
याचा परिणाम झाला असा की सत्ताधारी पक्षातील नेतेही आक्रमक झाले.शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकपक्षाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला मात्र त्यांनी या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बायकोला मध्ये आणले. अमृता फडणवीसांना या प्रकरणात ओढत त्यांना डान्सिंग डॉल संबोधित करत विद्या चव्हाण यांनी विधान केले होते.
आशिष शेलार सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलतात, म्हणून त्यांना धमकी; देवेंद्र फडणवीसांचा दावा
जितेन गजारिया यांना प्रतिउत्तर देत विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांना डान्सिंग डॉल म्हणत अपमान केला.याविरोधात अमृता फडणवीस यांनी ट्विट द्वारे विद्या चव्हाण यांना सणसणीत उत्तर देत अब्रू नुकसानीचा दावा केला.या गोष्टीमुळे अमृता फडणवीस व विद्या चव्हाण यांच्यातील वाद अजूनच पेटला.
जयदत्त अण्णांचा पुतण्याला धक्का; संदीप क्षीरसागरांना काकांच्या विरोधात साधा उमेदवारही देता आला नाही
यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांबद्दल बोलताना प्रत्येकाने म तो कोणीही असला तरी काळजी घेतली पाहिजे. केवळ पक्षांनीच नाही तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी असा सल्ला देखील फडणवीसांनी सर्वांना दिला आहे.
Read also:
- मुख्यमंत्री अजून हॉलिडे मूडमध्येच, राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये का? चित्रा वाघ कडाडल्या
- पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ खेडमध्येच होण्यासाठी आमदार लांडगे यांची ‘वज्रमूठ’
- पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; १४ फेब्रुवारीपासून सात टप्प्यांमध्ये होणार निवडणुका
- माझ्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार अधिकारी भाजपाचाच दलाल; मंत्री अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप
- …तर अशा पंतप्रधानांचा काय फायदा; मंत्री विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा