मुंबई : आमची गोव्यात आणि उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी सुरु आहे. गोवा, उत्तर प्रदेश पंजाबमध्ये इतर मोठे पक्ष आहेत. ते नक्कीच चांगली तयारी करत आहेत. त्यांचा प्रचार, बॅनर, होर्डिंग दिसत असतील. तसं काही शिवसेनेचं दिसत नसेल पण शिवसेनेचा विचार आणि भूमिका लोकांपर्यंत जात असते. आमचे कार्यकर्ते निवडणुका लढवत असतात आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे’, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जयदत्त अण्णांचा पुतण्याला धक्का; संदीप क्षीरसागरांना काकांच्या विरोधात साधा उमेदवारही देता आला नाही
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणुका होत आहेत. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केलीय. दरम्यान, अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
…तर अशा पंतप्रधानांचा काय फायदा; मंत्री विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
त्याचबरोबर शिवसेना स्वबळावर लढणार का किंवा अन्य राज्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग होईल? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘गोव्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. निदान गोव्यात तरी असा एखादा प्रयोग व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे नक्कीच एकत्र लढण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसनं आमच्यासोबत राहावं यासाठी मी स्वत: गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. पण जागा वाटपाबाबत काही अडचणी आहेत. काँग्रेसला अजूनही वाटतं की ते स्वबळावर सत्तेत येतील. त्यांना वाटतं की त्यांच्या 22 जागा येतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा. आम्हाला असं वाटतं की भाजपला रोखण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर त्यांनी सत्तेत यावं. त्यांना वाटतं की गोव्यात, उत्तर प्रदेशात ते स्वबळावर सत्तेत येतील तर त्यांनी यावं. पण आम्ही अजून काही दिवस प्रयत्न चालू ठेवू. आम्ही सर्व जागांवर लढू असं कधीच म्हटलं नाही. पण गोवा आणि उत्तर प्रदेशात आम्ही काही जागांवर नक्की लढू’, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.
Read also:
- महिलांबद्दल बोलताना सर्वांनीच काळजी घ्यावी; देवेंद्र फडणवीसांचा सर्वपक्षीय नेत्यांना मोलाचा सल्ला
- मुख्यमंत्री अजून हॉलिडे मूडमध्येच, राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये का? चित्रा वाघ कडाडल्या
- पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ खेडमध्येच होण्यासाठी आमदार लांडगे यांची ‘वज्रमूठ’
- पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; १४ फेब्रुवारीपासून सात टप्प्यांमध्ये होणार निवडणुका
- माझ्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार अधिकारी भाजपाचाच दलाल; मंत्री अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप