भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे.
राज्यात अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपमध्ये अमित शहांपासून ते अनेक आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांची पत्नी मेधा सोमय्यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1294987787091841024?s=20
निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.