मुंबई : दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे. गेल्या 1-2 महिन्यांपासून मंदिरे उघडण्यासाठी राज्यात भाजपकडून आंदोलने केली जात होती. अखेर सरकारने मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्णय घेण्यास उशीर झाला म्हणून भाजपकडून सरकारवर टीका केली जात आहे. उद्यापासून मंदिरे सुरू होणार आहेत, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम उद्या वाजत गाजत सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत.
उद्या सकाळी 11 वाजता #सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत गुलाल उधळत , वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार! महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारूण पराभव ! आणी महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा विजय ! जल्लोष साजरा करणार
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 15, 2020
उद्या सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. जल्लोष साजरा करणार, असे ट्विट करत राम कदम यांनी केले.
दरम्यान, गेल्या एक-दोन महिन्यांपासून राज्यातील मंदिर उघडण्यासाठी आंदोलनं सुरु होती. अखेर सरकारने सर्व धार्मिकस्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचं म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच पालन करावं लागणार आहे.