नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. आता महायुतीतील नेते देखील याबाबत मोदींची भेट घेणार आहेत.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महायुतीचे नेते मराठा आरक्षणाच्या मुद्याबाबत पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे सांगितले. येत्या 20 तारखेनंतर मोदींची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
येत्या 20 जूननंतर युतीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण आणि वादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी आदी मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय आणि एसी, एसटीचा पदोन्नतीतील आरक्षण हे मोठे विषय आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला योग्य प्रकारे भूमिका मांडता आलेली नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटलांना उत्तर देणे मी रास्त समजत नाही, फडणवीस बोलल्यावर बघू’
- ‘भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक, पण…’
- ‘शिवसेनेला वचन पळणारा मित्र म्हणणे ही पवारांची राजकीय हतबलता’
- वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंपाठोपाठ आता आदित्य ठाकरेंनीही केले ‘हे’ आवाहन
- कोरोनारुग्ण आणि मृतांची आकडेवारी लपवली जात आहे ? आरोग्य विभाग म्हणाले…