पुणे – आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपचे नगरसेवक आणि आमदारांच्या नुकतीच बैठक झाली. बैठकीत भाजपचे महाराष्ट्र युनिट अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना मिशन मोडवर गती देण्याचे आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्याचे आवाहन केले. 2014 च्या राज्यात विधानसभा निवडणुकीत, भाजपने पुणे शहरातील सर्व सहा जागा जिंकल्या होत्या, तर 2017 च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये मध्ये जोरदार विजय मिळवला होता.
‘प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध व्हावी’; बाळासाहेब थोरात करणार भाजपशी चर्चा
तसेच आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजपचे चाणक्य केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते फोडला जाणार आहे. यावरून पुणे महानगरपालिका 2022 च्या निवडणुकीची तयारी भाजपकडून जोरदार होत असल्याचे दिसत आहे
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. यावेळी महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन होईल. तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गोंधळ, राणे पिता-पुत्र आणि उदय सामंतांमध्ये शाब्दिक बाचाबाची
शहांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात आज महापौर बंगल्यावर बैठक पार पडली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात इतर महानगरपालिका निवडणुकी होणार आहेत.
Read Also :
- “वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”
- विमानातील प्रवाशासाठी भागवत कराड ठरले देवदूत; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक
- काँग्रेसला मोठा धक्का: माजी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या गळाला, पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यातच घातला दगड
- “आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार”; राणेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल