नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड केलेल्या एका मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीही भारावून गेले. डॉ. कराड विमानातून प्रवास करत असताना एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला सारत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या या मदतीचं पंतप्रधान मोदींनीही ट्वीटवरून कौतुक केलं.
हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे इंडिगोच्या विमानातून दिल्लीवरून मुंबईला येत होते. विमान हवेत झेपावल्यानंतर तासाभराने विमानातील एका प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने उद्घोषणा करत विमानात कुणी डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली. ही घोषणा ऐकून केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी तातडीने तब्येत बिघडलेल्या प्रवाशांच्या दिशेनं धाव घेतली. भागवत कराड सर्जन असून, त्यांनी तातडीने रुग्णावर प्राथमिक उपचार केले आणि विमानातील आपतकाळीन किटमधील औषधीही दिली. त्यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.
Thank you, Hon. Prime Minister @narendramodi ji. I am truly humbled and hope to translate your outstanding commitment and dedication to our country and citizens in my own duties. Following your guidance to serve people through "Seva aur Samarpan".
Jai Hind https://t.co/FHqNqHaQzc— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) November 16, 2021
ही सर्व घटना मुंबईच्या दिशेनं येत असताना घडली. इंडिगोनं आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्वीट करत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड यांचे आभार मानले. ‘केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड यांचे आम्ही आभारी आहोत. ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवली नाही. डॉ. कराडजी आपण एका सहप्रवाशाला मदत करणं, ही गोष्ट प्रेरणादायी आहे’, असं इंडिगोनं म्हटलं होतं. इंडिगोचं ट्वीट सगळीकडे व्हायरल झालं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनीही कराड यांचं तोंडभरून कौतुक केलं.
Read Also :
- काँग्रेसला मोठा धक्का: माजी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या गळाला, पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यातच घातला दगड
- “आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार”; राणेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- ठाकरे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं, पडळकरांचा घणाघात
- नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल