नांदेड : त्रिपुरा येथे मशिदीची विटंबना केल्याच्या कथित प्रकरणावरुन राज्यात ठराविक मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढले होते आणि त्या मोर्चांदरम्यान मोठा हिंसाचार आणि दगडफेक झाली होती. अशाच प्रकारची दगडफेक नांदेडमध्ये देखील झाली होती याच दगडफेकीच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या जवळपास 400 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक
यामधील 83 आरोपी निष्पन्न झाले असून आतापर्यंत 50 आरोपींना अटक करण्यात आली असून रझा अकादमीच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचं व्यासपीठावरुन प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर ही कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली.
“बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”
दरम्यान दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला बंद रद्द झाला असला तरीही आज पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त वाढवला असल्याची माहिती देखील संजय कुमार यांनी दिली आहे. शिवाय उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आले आहे. नांदेडमधील दगडफेक प्रकरण आणि आजच्या बंदचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार नांदेड मध्ये आले असताना त्यांनी सदरची माहिती दिली.
Read Also :
- हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल
- अमरावती दंगल घडवण्यामागे मंत्री नवाब मलिकांचा हात
- सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीच्या नेत्याने नाना पटोलेंना ठणकावलं
- काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जुंपली; भाई जगतापांची थेट सोनिया गांधीकडे तक्रार
- ‘प्रज्ञा सातव यांची निवड बिनविरोध व्हावी’; बाळासाहेब थोरात करणार भाजपशी चर्चा