मुंबई : भाजपा नेते नितेश राणे यांनी पुन्हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना एका व्यंग्यचित्रावरून लक्ष्य केले आहे. ‘पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशी पोटी काम करी’ असे ट्विटमध्ये राणेंनी म्हटले आहे. सोबतच ‘बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा आहे आणि सामान्य जनता महाविकास आघाडी सरकारने दिलेली सजा भोगत आहे.’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीला मोठा झटका, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत ‘हा’ नेता भाजपाचे कमळ घेणार हाती
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये एक व्यंग्यचित्रदेखील शेअर केले आहे. यामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवण्यात आले आहे. ते विमानातून खाली बघत आहेत. तर खाली असलेल्या चार व्यक्तींमधील एक शेतकरी, दुसरा एमपीएससी विद्यार्थी, तिसरा डॉक्टर तर चौथा एसटी कर्मचारी असे दाखवले आहे. या व्यंग्यचित्रामध्ये हे सर्व जण हात जोडून आदित्य ठाकरे यांना आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत, असे व्यंग्यचित्र नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. यामध्ये, बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा, असे म्हणत आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या तब्बल 800 शाळा अंधारात; निम्याहून अधिक शाळा सुप्रिया सुळेच्या मतदारसंघात
काय आहे व्यंगचित्र?
या व्यंगचित्रामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करताना राणे यांनी बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये महाविकास आघाडीची सजा असे म्हणत आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा
जनतेच्या नशिबात आघाडीची सजा #BJPMaharashtra #Penguin pic.twitter.com/mYr8SL7pXT— nitesh rane (@NiteshNRane) November 16, 2021
Read Also :
- ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक
- केंद्र सरकारने झाकीर नाईकचा फास आवळला, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षासाठी बंदी
- “अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा
- समीर वानखेडे पुन्हा रडारवर; नवाब मलिकांनी उघड केलं ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट
- आम्ही फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही – आशिष शेलारांचा इशारा