गोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण, गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे पुत्र आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. विजय शिवणकर हे प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात.
“राज्यात दंगली भडकवण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात आघाडीचाच हात”
जिल्हा परिषद निवडणूक समोर असतांना विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काहीच आलबेल नाही हे सिद्ध झाले असून त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षाशी नाराज असल्याचे म्हटले आहे.
दिलासा नाहीच: अनिल देशमुख यांना २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
विजय शिवणकर यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस साठी मोठा धक्का मनाला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिवणकर हे आज भारतीय जनता पक्षात (BJP) अधिकृत प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विजय शिवणकर हे नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपल्या मनगटावरील राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Also :
- “अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा
पेट्रोल-डिझेलची किंमत अमेरिका ठरवते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा जावईशोध
- समीर वानखेडे पुन्हा रडारवर; नवाब मलिकांनी उघड केलं ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट
- आम्ही फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही – आशिष शेलारांचा इशारा
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला