औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असतात. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिकेत ठरतात. केंद्र सरकार पेट्रोलच्या किंमती वाढवत नाही. त्यामुळे दरवाढीवरुन आमच्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे अजब स्पष्टीकरण इंधन दरवाढीवर दानवे यांनी दिले आहे. औरंगाबादेत भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्र सरकारने कर घटवला आहे. मात्र राज्य सरकार त्यांचे कर कमी करण्यास तयार नाही. हे आम्ही नागरिकांना सांगणार आहोत, असे दानवे म्हणाले.
शिवशाहिराला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला; बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन
देश केंद्र सरकारच्या पैसावर चालत असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेत नाहीत. जर आम्ही याबाबत लोकांना सांगितले तर मला खात्री आहे, की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंड दाखवायलाही संघर्ष करावे लागले, असे दानवे म्हणाले.
चित्रा वाघ आमदार होणार? भाजपकडून विधानपरिषदेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता
तसेच औरंगाबाद शहरात गुंठेवारी प्रकरणी महापालिकेकडून विविध मालमत्ता नियमितीकरणाचे काम सुरू आहे, त्यावर भाष्य करताना रावसाहेब दानवे म्हणाले, महापालिका प्रशासकांकडून धमकावण्याचे काम सुरु आहे. मात्र पालकमंत्री आले आणि त्यांनी स्थगिती दिली. एकिकडे लोकांना धाक दाखवायचा आणि दुसरीकडे स्थगिती देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे दाखवायचे, तुमच्यात दम असेल तर एक झोपडी पाडून दाखवा. भाजप एकही झोपडी पडू देणार नाही. शिवसेनेने गुंठेवारी असो की झोपडपट्टी असो. एकाही घराला हात लावला तर रस्त्यावर फिरणे मुश्कील करू, असा इशारादेखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना दिला.
Read Also :
- समीर वानखेडे पुन्हा रडारवर; नवाब मलिकांनी उघड केलं ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट
- आम्ही फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही – आशिष शेलारांचा इशारा
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
- ‘आधी तुरुंगातील जेवण घ्या’, अनिल देशमुखांना घरचे जेवण देण्याची मागणी कोर्टाने फेटाळली
- ‘आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात कोणती मिटिंग करत होते?, हा षडयंत्राचा भाग होता का?’