मुंबई : प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित झाल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. यामुळे आता चित्रा वाघ या आमदार म्हणून विधानसभेत सरकारला धारेवर धरताना दिसू शकतील.
धमकी देऊन न्याय मिळत नाही, हायकोर्टात आपली बाजू मांडावी – अनिल परब
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी चित्रा वाघ यांचं नाव सर्वात पुढे आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. उद्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर होणाऱ्या कोअर कमिटी बैठकीत यावर अंतिम शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.
अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक
धुळे-नंदुरबारमधून पुन्हा एकदा अमरीश पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमधून शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे ही दोन नावे चर्चेत असून यातील एका नावावर शिक्कामोर्तब होईल. यामध्ये शौमिका महाडिक यांचे नाव आघाडीवर आहे. शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या आहेत. नागपूरच्या जागेसाठी भाजपत अद्याप खल सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १० डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Read Also :
- ‘..पण सत्तेसाठी पटोले तलवार मान्य करतील’, दरेकरांचा हल्लाबोल
- शिवशाहिराला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला; बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन
- यशोमती ठाकूर राजकीय पोळी भाजण्याचे काम करतायं, मुख्यमंत्र्यानी राजीनामा घ्यावा – रवी राणा
- “राज्यात दंगली भडकवण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात आघाडीचाच हात”
- वर्ध्यात भाजपला बसला मोठा धक्का; नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्षाने केला काँग्रेसमध्ये प्रवेश