अमरावती : अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक करण्यात आली. यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह महापौर चेतन गावंडे आणि भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय यांना अटक करण्यात आली आहे.
काँग्रेसने मित्र पक्षापासून सावध राहावे; नाना पटोलेंच्या मनात राष्ट्रवादीबद्दल सल?
त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. या बंदने हिंसक वळण घेत अनेक दुकानाची तोडफोड करण्यात आली. तसेच काही दुकानांना आग लावण्यात आली. सर्वाधिक उपद्रव राजकमल चौक, नमुना परिसरात झाला.
ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांची लढाई नाही, ही लढाई समाजाला न्याय देण्याची – आशिष शेलार
शहर कोतवाली पोलिसांनी त्याप्रकरणी दोन्ही गटातील जमावाविरुद्ध जाळपोळ, दगडफेकप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले. तर खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेबारानंतर छत्रपुरी खिडकी परिसरात तीन व्यापारी प्रतिष्ठानांना काही उपद्रवींनी लक्ष केले. बंद प्रतिष्ठाने फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज लुटल्या गेला, असे खोलापुरीगेट पोलिसांनी सांगितले. त्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपचे महापौर चेतन गावंडे यांना अटक केली आहे. तसेच भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि सभागृह नेते तुषार भारतीय यांना अटक केली आहे.
Read Also :
- एकत्र येण्याची इच्छा उरली नाही; भाजप- सेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
- बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही
- शिवचरित्राचा महान उपासक गमावला, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली – चंद्रकांत पाटील
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मावळली; अंत्यदर्शनाला गर्दी, मान्यवरांकडून श्रद्धांजली
- परळीची जनता हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं – पंकजा मुंडे